नवीन काय आहे

माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते न्यू कॉलेज परमिशन सिस्टम (एनसीपीएस) च्या ऑनलाइन पोर्टलचे उद्घाटन झाले

सन 2023-24 ग्रंथालय पुरस्कार वितरण सोहळा

100 दिवसांच्या कृती आराखड्यासंदर्भात आढावा बैठक

माननीय मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या डॅशबोर्ड चे उद्घाटन झाले

100 दिवसांच्या कृती आराखड्यासंदर्भात आढावा बैठक

अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम

विद्यापीठ अनुदान आयोगासोबत बैठक

संविधान अमृत महोत्सव

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान सोहळा



image description

माननीय मंत्र्यांचा संदेश
उच्च आणि तांत्रिक शिक्षण

आपल्या सर्वांना उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून मनःपूर्वक शुभेच्छा देताना मला अत्यंत आनंद होत आहे आणि ही जबाबदारीही मोठी असल्याची जाणीव होत आहे. उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री म्हणून, आपल्या राज्यातील प्रत्येक व्यक्तीला दर्जेदार शिक्षण व प्रगती आणि यश मिळविण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यास मी कटिबद्ध आहे.

शिक्षण हे कोणत्याही समाजाच्या प्रगतीचे आणि विकासाचे भक्कम अधिष्ठान आहे. शिक्षण व्यक्तीला समर्थ बनवते, नवोन्मेषाला प्रोत्साहन देते आणि आर्थिक समृद्धीस चालना देते. आजच्या वेगवान व गतिमान जगात आपल्या उच्च व तांत्रिक शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना २१व्या शतकात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्ये आणि दृष्टीकोन प्रदान करणे अत्यावश्यक आहे.

आमचा विभाग सर्वसमावेशक, उत्साही आणि भविष्याभिमुख शैक्षणिक परिसंस्था निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. बौद्धिक जिज्ञासा, चिकित्सक दृष्टीकोन आणि उत्कृष्टतेच्या ध्यासाला प्रोत्साहन देणारे पोषक वातावरण उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. सातत्यपूर्ण सुधारणा आणि धोरणांद्वारे आम्ही शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी, बहुविषयक शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेष यांना चालना देण्यासाठी तसेच शैक्षणिक संस्था, उद्योग आणि शासन यांच्यातील सहयोग दृढ करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

मी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा सर्वतोपरी लाभ घ्यावा, असे आवाहन करतो. आंतरविषयक व बहुविषयक शिक्षणात सहभागी व्हा, विविधतेला स्वीकारा आणि सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे भाग घ्या. मार्गदर्शनाचा शोध घ्या, संशोधनाच्या संधींचा अभ्यास करा आणि जागतिक दृष्टीकोन विकसित करा. लक्षात ठेवा, शिक्षण हे केवळ ज्ञान संपादनापुरते मर्यादित नसून मूल्ये, संवेदनशीलता व नेतृत्वगुणांचा विकास करण्याबाबतही आहे, जे आपल्या संपूर्ण आयुष्यभर आपल्याला उपयुक्त ठरणार आहेत.

आपल्या मान्यवर प्राध्यापकवर्ग आणि कर्मचारीवर्ग यांना मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. भावी पिढ्यांचे मन घडविण्याच्या आपल्या अखंड प्रयत्नांबद्दल मी आपले आभार मानतो. आपली निष्ठा, तज्ज्ञता आणि कार्याबद्दलची उत्कटता ही शिक्षण व नवोन्मेषासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात अत्यंत मोलाची ठरत आहे.

पालक, उद्योगक्षेत्रातील नेतृत्वकर्ते तसेच धोरणनिर्माते अशा सर्व भागधारकांना मी आवाहन करतो की, उच्च व तांत्रिक शिक्षणामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडविण्याच्या आमच्या ध्येयात आपण हातभार लावावा. चला, आपण सर्व मिळून ज्ञानाधिष्ठित समाज घडवूया, जो भावी आव्हानांचा समर्थपणे सामना करण्यास सक्षम असेल आणि राष्ट्राच्या प्रगतीत मोलाचे योगदान देईल. एकत्रित प्रयत्नांद्वारे आपण असे भविष्य उभारूया, जिथे शिक्षण हे सर्वसमावेशक विकास, सबलीकरण आणि उज्ज्वल उद्याचे प्रेरणास्थान ठरेल.
अधिक वाचा

संचालनालये



घोषणा

University List











संग्रहण तपशील


संपर्क करा

411, चौथा मजला, मंत्रालय परिशिष्ट, मॅडम कामा रोड, नरिमन पॉइंट,

मुंबई – 400032

दूरध्वनी: 022-22025301

 
अभ्यागतांची संख्या: 46784