१०० दिवसांच्या कार्यक्रमाचा अहवाल

१०० दिवस कार्यक्रमाची सद्यस्थिती निहाय माहिती
अ.क्र. मुद्दा कार्यवाही पूर्ण / अपूर्ण पूर्ण असल्यास त्याबाबतची माहिती व शासन
निर्णय / फोटो / इ. अभिलेख किंवा त्याची लिंक
अपूर्ण असल्यास सद्यस्थिती व
कार्यवाही पूर्ण करण्याची कालमर्यादा
1 विद्यापिठांमध्ये सुरु असलेली प्राध्यापकांची भरती पूर्ण करणे. कार्यवाही पूर्ण विद्यापीठातील भरती प्रक्रियेबाबत अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने कार्यपध्दती विहित करुन विद्यापीठांमध्ये सुरु असलेली अध्यापकांची भरती प्रक्रिया सुरु करण्यास मंजूर देण्याबाबत दि.28/02/2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
--
2 विद्यार्थी संपर्क अभियान: शाळा कनेक्ट २.० कार्यवाही पूर्ण विद्यार्थी संपर्क अभियानः स्कुल कनेक्ट २.० याबाबत दि. २० डिसेंबर, २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यानुसार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 ची राज्यामध्ये अंमलबजावणी केल्यामुळे झालेले सकारात्मक बदल, नवीन अभ्यासक्रम व श्रेयांक आराखडा, ऑनलाईन शिक्षणक्रम, विद्यार्थ्यासाठी उपलब्ध असलेल्या केंद्र राज्य शासनाच्या शिष्यवृत्त्या इ.बाबतची माहिती विद्यापीठ कार्यक्षेत्रातील शाळा- महाविद्यालयातील इयत्ता 9 ते इयत्ता 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ स्तरावरुन देणे अभिप्रेत होते.त्यानुषंगाने सदर अभियान दि. 1 जानेवारी, 2025 ते दि. 15 जानेवारी, 2025 या कालावधीत राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठांतर्गत राबविण्यात आला आहे. जवळपास दोन लक्ष विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवून मार्गदर्शनाचा लाभ घेतला आहे.
--
3 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीला चालन देणे. कार्यवाही पूर्ण “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा उपक्रम राबविणेबाबत दि. 20 डिसेंबर, 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. राज्यातील वाचन संस्कृती वृध्दिंगत करण्यासाठी दि. 01 ते 15 जानेवारी, 2025 या कालावधीत राज्यामध्ये “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा अनोखा उपक्रम राज्यातर्फे राबविण्यात आला आहे. राज्यातील 6000 च्या वर महाविद्यालयांनी या उपक्रमात सहभाग घेतला असून, या कालावधीत दोन लाखापेक्षा जास्त विद्यार्थी, 22000 पेक्षा अधिक शिक्षक आणि 17000 पेक्षा अधिक पालक व इतरांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदविला आहे. पुस्तक प्रदर्शन, वाचक लेखक संवाद, ग्रंथालय स्वच्छता, सामुहिक वाचन, दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन, गटवाचन, अभिरुप वाचन, पुस्तक समीक्षण, पुस्तक परीक्षण अशा प्रकारचे विविध उपक्रम महाविद्यालयांनी राबविले आहेत.
--
4 विद्यापीठाअंतर्गत विविध विभागांना मानांकन (Ranking) देणे. UDRF कार्यवाही पूर्ण राज्यातील अकृषी विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विद्यापीठातील विविध विभागांकडून संशोधनाला चालना देणे, उपलब्ध संसाधनांचा पुरेपूर कार्यक्षम वापर करणे, कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि जबाबदारी आणणे व एक स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे यासाठी विद्यापीठ अंतर्गत विभागांना मानांकन देण्याचा उपक्रम राबविण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय दि. 07.03.2025 अन्वये देण्यात आल्या आहेत.
--
5 महाज्ञानदीप पोर्टल कार्यवाही पूर्ण "महाज्ञानदीप पोर्टल" तयार करुन याद्वारे महाराष्ट्राच्या परिप्रेक्ष्यामध्ये उत्तमोत्तम अध्ययन साहित्य, अध्यापन गुणवत्तापूर्णरितीने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने दि. 17.04.2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुसार नजीकच्या काळात याद्वारे ऑनलाईन अभ्यासक्रम विकसित करुन त्याचा जास्तीत जास्त लाभ विद्यार्थ्यांना कसा होईल यादृष्टीने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या स्तरावरुन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. महाज्ञानदीप पोर्टलची लिंक पुढीलप्रमाणे आहे. https://mahadnyandeep.org/
--
6 MahaSARC स्थापन करणे कार्यवाही पूर्ण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 मधील तरतूदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उच्च शिक्षण, संशोधन व नवोपक्रम या क्षेत्रातील उत्कृष्टता अधिक बळकट करण्यासाठी, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील संकल्पना, विचारसरणी, चिंतनप्रक्रिया आणि तर्कशास्त्र यांची व्यापक स्वरुपात देवाणघेवाण घडवून आणण्यासाठी व मार्गदर्शक सूचना तयार करण्यासाठी दि. 22.04.2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद (MahaSARC) ची स्थापना करण्यात आली आहे.
--
7 विभागाचा सर्वसमावेशक डॅशबोर्ड कार्यान्वित करणे कार्यवाही पूर्ण मा. मंत्री (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) यांच्या हस्ते दि. 24.04.2025 रोजी डॅशबोर्डचा शुभारंभ करण्यात आला. विभागाचा डॅशबोर्ड आता सर्वसामान्यांसाठी विभागाच्या http://htedu.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लिंकद्वारे उपलब्ध आहे. राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांचा अद्ययावत तपशिल एकत्रित स्वरुपात एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याकरीता उच्च व तंत्र शिक्षण विभागाने डॅशबोर्ड विकसित केला आहे. सदर डॅशबोर्डमध्ये विद्यार्थ्यांशी संबंधित प्रवेश परीक्षा, निकाल, शिष्यवृत्ती, प्रकाशित संशोधन पत्रिका, वसतीगृह सुविधा, शुल्क आणि महाविद्यालयांशी संबंधित संलग्नता व शैक्षणिक सुविधा तसेच सार्वजनिक ग्रंथालये या माहितीचा समावेश आहे. या डॅशबोर्डमधील माहितीचे विश्लेषण करुन या आधारे शैक्षणिक विषयांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यास तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरीता मोलाची मदत होणार आहे. तसेच विद्यार्थी व पालकांना त्यांच्या शैक्षणिक बाबींकरीता खात्रीशीर व अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे.
--
8 अप्रेंटिसशीप एम्बेडेड डिग्री प्रोगॅम (AEDP) कार्यवाही पूर्ण अप्रेंटिसशीप एम्बेडेड डिग्री प्रोग्रॅम (AEDP) संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने दि.24.03.2025 रोजी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यांचा अभ्यास करुन सदर मार्गदर्शक सूचना दि. 22.04.2025 च्या शासन निर्णयान्वये स्विकरण्यात आल्या असून शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यातील अकृषि सार्वजनिक विद्यापीठांमध्ये लागू करण्याबाबतच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सदर सूचनांच्या अनुपालन करण्याबाबतच्या सविस्तर सूचना शासन परिपत्रक दि. 22.04.2025 अन्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत.
--
9 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक डिजीटल विद्यापीठात उन्नत करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगास सादर कार्यवाही पूर्ण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक डिजीटल विद्यापीठात उन्नत करण्याच्या अनुषंगाने विद्यापीठ अनुदान आयोगास (UGC) दि. 15 एप्रिल, 2025 रोजीच्या पत्रान्वये प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
--
10 उच्च शिक्षणाची केंद्रे स्थापनेसाठी धोरणात्मक आराखडा तयार करण्याकरीता सल्लागार संस्थेची नेमणूक करणे.(EDUCATION HUB) कार्यवाही पूर्ण राज्यामध्ये शैक्षणिक केंद्र (EDUCATION HUB) तयार करण्याच्या अनुषंगाने धोरणात्मक आराखडा तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान संचालनालय, शासन निर्णय क्रमांक GAD-IT 080/ 4/ 2014-0/0 Directorate of IT-DIT (MH) date 05th October, 2023 नुसार नामनिर्देशित केलेल्या संस्थांपैकी M/s Pricewaterhouse Coopers Pvt. Ltd यासंस्थेची शासन निर्णय दि. 22.04.2025 अन्वये नियुक्ती करण्यात आली आहे.
--
11 विद्यापीठांतर्गत आदिवासी अध्यासन केंद्रांमार्फत सुरु असणारे अभ्यासक्रम विचारात घेऊन त्यांचे बळकटीकरण करणे तसेच त्यांच्यात समन्वय साधण्यासाठी Monitoring Council ची स्थापना करणे कार्यवाही पूर्ण आदिवासी भाषा, संस्कृती व जीवनशैली यांचे जतन व संवर्धन तसेच आदिवासींचे आर्थिक सक्षमीकरण आणि आदिवासी विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढविण्यासाठी त्यांना दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था करून त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी राज्यातील आदिवासी बहुल क्षेत्रातील जळगाव, नांदेड व मुंबई येथील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये अस्तित्वात असलेल्या आदिवासी अध्यासन केंद्रांचे बळकटीकरण करणे तसेच अमरावती व गडचिरोली येथील सार्वजनिक विद्यापीठामध्ये नव्याने अध्यासन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय शासनाने दि. 17 एप्रिल, 2025 च्या शासन निर्णयाने घेतला आहे. या शासन निर्णयाद्वारे सर्व आदिवासी अध्यासन केंद्रांमध्ये समन्वय साधण्यासाठी समन्वय समिती (Monitoring Council) स्थापन करण्यात आली आहे.
--
एकूण एकूण संख्या - 11 एकूण पूर्ण कामांची संख्या - 11 एकूण अपूर्ण कामांची संख्या - 0