ग्रंथालय संचालनालय (DOL)

संचालक, ग्रंथालये (DOL) हे शिक्षणाचा प्रसार, ज्ञानवृद्धी, माहितीची उपलब्धता आणि मनोरंजन यामध्ये सार्वजनिक ग्रंथालय प्रणालींची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखतात. शासन विविध ग्रंथालय सेवांची अंमलबजावणी DOL मार्फत करते. सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासात DOL मोलाची भूमिका बजावतो. या विभागाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशभरात वाचनाची सवय वाढविणे, ग्रंथालयांचे आधुनिकीकरण टिकवून ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे हे आहे. तसेच वाचकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ई-शासनाची अंमलबजावणी करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रंथालयांची उपयुक्तता टिकविणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम, वाचन उपक्रम आदींसाठी निधी उपलब्ध करून देणे यामध्ये देखील हा विभाग महत्त्वाची भूमिका पार पाडतो. Read more...