तंत्रशिक्षण संचालनालय (DTE)
तांत्रिक शिक्षण संचालनालय हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तांत्रिक शिक्षण विभागांतर्गत कार्य करणारे एक राज्यस्तरीय कार्यालय आहे. महाराष्ट्रातील सर्व तांत्रिक शिक्षण संस्था राज्य व केंद्र शासनाने आखून दिलेल्या नियम व मार्गदर्शक तत्वांचे पालन करतात याची खात्री करणे हे या विभागाचे मुख्य उद्दिष्ट आहे. विविध शासकीय योजना तांत्रिक संस्थांमध्ये प्रभावीपणे राबवून तांत्रिक शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हा विभाग करीत आहे.
तसेच, धोरणे ठरविणे, शासकीय संस्थांमध्ये पायाभूत सुविधा उभारणे, खासगी संस्थांना मार्गदर्शन करणे, उद्योग, व्यावसायिक संस्था व राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्थांशी परस्पर संवाद वाढविणे या माध्यमातून विभाग तांत्रिक शिक्षणाची गुणवत्ता कायम राखतो व उंचावतो.
Read more...