वैधानिक संस्था
1.   सीईटी
कॉमन एंट्रन्स टेस्ट (CET) सेल हे महाराष्ट्रातील विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेणारे एक महत्त्वाचे वैधानिक मंडळ आहे. CET विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठे, महाविद्यालये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया न्याय्य आणि पारदर्शक ठेवते. प्रमाणित परीक्षा घेऊन, CET शैक्षणिक संस्थांना उमेदवारांची गुणवत्ता व पात्रता तपासण्यास मदत करते, ज्यामुळे गुणवत्ता-आधारित प्रवेश सुलभ होतो.
Read more...
2.   एफआरए
FRA म्हणजे फी रेग्युलेटरी अथॉरिटी महाराष्ट्र. ही एक वैधानिक संस्था असून राज्यभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये आकारण्यात येणाऱ्या शुल्कांचे नियमन करण्याची जबाबदारी तिची आहे. FRA चे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शैक्षणिक संस्थांकडून आकारण्यात येणारे शुल्क वाजवी आणि परवडणारे ठेवणे, तसेच दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची गुणवत्ता टिकवून ठेवणे. विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, अवाजवी शुल्कवाढ रोखणे व शुल्क संरचनेत पारदर्शकता आणणे यात FRA महत्त्वाची भूमिका बजावते. संस्थेकडून शैक्षणिक संस्थांचे शुल्क ठरविण्यासाठी व नियमन करण्यासाठी वेळोवेळी पुनरावलोकने व भागधारकांशी चर्चासत्रे घेतली जातात.
Read more...
3.   एमएसबीटीई
महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळ (MSBTE) हे डिप्लोमा, पोस्ट-डिप्लोमा आणि अॅडव्हान्स डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी अभ्यासक्रमाची आखणी व विकास करण्यास जबाबदार आहे. मंडळ प्राध्यापकांसाठी अभ्यासक्रम अद्ययावत करणे, सॉफ्ट स्किल्स, औद्योगिक व व्यवस्थापन प्रशिक्षण, तसेच पॉलिटेक्निक शिक्षकांसाठी प्रत्यक्ष कौशल्य प्रशिक्षण अशा प्रकारचे विकास कार्यक्रम आयोजित करते. MSBTE तांत्रिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी, विशेषतः दुर्गम भागांमध्ये करिअर मेळावे भरवते व राज्यस्तरीय तांत्रिक स्पर्धा जसे की विद्यार्थी पेपर सादरीकरण, प्रश्नमंजुषा व इतर उपक्रमांचे आयोजन करते.
Read more...