क्रमांक नवीन महाविद्यालय,नवीन अभ्यास पाठयक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकडी साठी (कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक) अर्ज भरताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत (उच्च व तंत्र शिक्षण विभाग , शासन निर्णय क्रमांक: एनजीसी २०१७/(२२९/१७)/मशि -४, दिनांक- १२ ऑक्टोबर २०१७ नुसार)
१. नवीन महाविद्यालय,नवीन अभ्यास पाठयक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकडी करिता अर्ज करण्यासाठी संस्थेने अर्जदारास प्राधिकृत केल्याबाबतचे प्रमाणपत्र. ( विहित नमुना Downlaod )
२. संस्था नोंदणी प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत.(मुंबई सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियम १९५०, संस्था नोंदणी अधिनियम १८६०, कंपनी अधिनियम, १९५६, कंपनी अधिनियम २०१३)
३. संस्थेच्या संविधानात शैक्षणिक बाबीसंबंधी नमूद तरतुदीबाबतची कागदपत्रे.
४. नवीन महाविद्यालय सुरु करण्यासंबंधी संस्थेच्या ठरावाची प्रत.
५. अर्जदार संस्थेच्या सद्य:स्थितीत अस्तित्वात असणारी महाविद्यालये मूल्यांकन / पुनर्मूल्यांकनाकरिता पात्र ठरली असल्यास नॅक / एनबीए मानांकन व मूल्यांकन , पुनर्मूल्यांकन करून घेण्यासंदर्भातील तपशील
६. संस्थेच्या चालू वर्षाच्या तपशीलवार अंदाजपत्रकाची साक्षांकित प्रत.
७. संस्थेच्या मागील वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालाची सनदी लेखापाल (Charted Accountant) यांनी प्रमाणित केलेली प्रत.
८. संस्थेचे आर्थिक व्यवहार राष्ट्रीयकृत / शेड्युल बँकेमार्फत केले जात असल्याचे कागदपत्र. (संस्थेचे नाव ,बँकेचे नाव व बँकेचा IFSC CODE दर्शवणारे कागदपत्र उदा. बँक बॅलन्स स्टेटमेंट, पासबुक चे प्रथम पृष्ठ व अंतिम पृष्ठ)
९. प्रस्ताव ज्या शैक्षणिक वर्षासाठी दाखल केला आहे त्या शैक्षणिक वर्षापासून पुढीलप्रमाणे किमान ५ वर्ष, किमान मुदत ठेवची (Fix Deposit) प्रमाणित प्रत व संयुक्त आश्वासन पत्र (विहित नमुना Download)
(१) नवीन महाविद्यालय -  रु.१,००,०००/-  (२) नवीन अभ्यास पाठयक्रम - रु.५०,०००/-  (३) विषय - रु.२५,०००/-   (४) विद्याशाखा - रु.५०,०००/-  (५) अतिरिक्त तुकडी - रु.२५,०००/-

१०. शासनाचे कायम विनाअनुदानित धोरण लक्षात घेता, अर्जासोबत महाविद्यालयाचा नियमानुसार वेतन व वेतनतर खर्च संस्था करणार असल्याबाबतचे रु. ५००/- स्टॅम्पपेपरवर नोंदणीकृत हमीपत्र. (विहित नमुना Download)
११. संस्थेचे सद्यस्थितीत कनिष्ठ महाविद्यालय/शाळा अस्तित्वात असेल तर, कनिष्ठ महाविद्यालय/शाळेच्या अस्तित्वात असलेल्या इमारतीचा वापर प्रस्तावित वरिष्ठ महाविद्यालयासाठी केला जाणार नाही, असे हमीपत्र तसेच, कनिष्ठ महाविद्यालयाच्या बांधकामाचा प्रमाणित नकाशा. ( विहित नमुना Download )
१२. संस्थेच्या एकाच शैक्षणिक संकुलामध्ये नवीन प्रस्तावित वरिष्ठ महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय/शाळा असेल तर त्याच शैक्षणिक संकुलामधील कनिष्ठ महाविद्यालय/शाळा/अन्य वरिष्ठ महाविद्यालय यांकरिता विहित राखीव क्षेत्रफळ असलेबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.
१३.
  • "अ", "ब" आणि "क" वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये १०,००० चौ. फुट जागा संस्थेच्या नावावर असलेल्या सरकारी कागदपत्रांची प्रमाणित प्रत. उदा.- गाव नमुना नं. ७/१२ अथवा मालमत्ता पत्रक
  • "ड" वर्ग महापालिका व नगरपालिका क्षेत्रात किमान २०,००० चौ. फुट अकृषक जागा संस्थेच्या नावावर असलेल्या सरकारी कागदपत्रांची प्रमाणित प्रत. उदा. गाव नमुना नं. ७/१२ अथवा मालमत्ता पत्रक
  • उर्वरित सर्व क्षेत्रांसाठी किमान १ एकर अकृषक जागा संस्थेच्या नावावर असलेल्या सरकारी कागदपत्रांची प्रमाणित प्रत. उदा. गाव नमुना नं. ७/१२
  • "अ", "ब" आणि "क" वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये १०,००० चौ. फुट जागा संस्थेच्या नावे भाडेतत्वावर घेतलेल्या नोंदणीकृत कराराची प्रत उदा. गाव नमुना नं. ७/१२ अथवा मालमत्ता पत्रक
  • "ड" वर्ग महापालिका व नगरपालिका क्षेत्रात किमान २०,००० चौ. फुट अकृषक जागा संस्थेच्या नावे भाडेतत्वावर घेतलेल्या नोंदणीकृत कराराची प्रत.
  • उर्वरित सर्व क्षेत्रांसाठी किमान १ एकर अकृषक जागा संस्थेच्या नावे भाडेतत्वावर घेतलेल्या नोंदणीकृत कराराची प्रत.
१४. नवीन महाविद्यालयकरीता/ नवीन अभ्यास पाठयक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकडी ज्या महाविद्यालयात सुरु करावयाचे आहे, त्या महाविद्यालयकरीता दर्शविलेल्या जागेसंदर्भात तसेच अन्य कोणत्याही प्रकरणी संस्थेमध्ये अंतर्गत व बाह्य कसल्याही प्रकारचा वाद-विवाद, भांडण-तंटे, तक्रारी व न्यायालयीन प्रकरणे सद्यस्थितीत चालू किंवा प्रलंबित नसल्याबाबतचे संस्थेचे हमीपत्र. ( विहित नमुना Download )
१५. संस्थेचा शिक्षण क्षेत्रातील पूर्वानुभव, संस्थेचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान, विविध शैक्षणिक प्रकल्पांबाबतची माहिती आणि काही ठळक विशेष संपादणूक असल्यास, त्याबाबची कागदपत्रे
१६. १. प्रस्तावित महाविद्यालयाची इमारत (संस्थेची /भाडेतत्त्वावरील )- संबंधित स्थानिक स्वराज संस्था किंवा अन्य संबंधित प्राधिकरणाचे इमारत बांधकाम पुर्णत्वाबाबतचे प्रमाणपत्र, ज्यामध्ये इमारतीचे क्षेत्रफळ चौ.फु./चौ.मी. गट/सर्वे नंबर आणि ज्याभागातील इमारत आहे त्याबाबतचा तपशील नमूद अनिवार्य आहे.
२. इमारत भाडेतत्वावरील असल्यास अर्ज करावयाच्या वर्षापासून पुढील किमान ५ वर्ष कालावधीचा नोंदणीकृत भाडेकरारनामा
३. शैक्षणिक व प्रशासकीय इमारती मधील कक्षांचा तपशील
४. पाणी सुविधा (प्रस्ताव ज्या वर्षी दाखल केला जाईल त्या पूर्वीच्या वर्षातील स्थानिक प्राधिकरणाची पाणी पट्टी पावती)
५. वीज सुविधा ( प्रस्ताव ज्या महिन्यात दाखल केला जाईल त्या पूर्वीच्या महिन्यातील वीज देयकाची प्रत)
६. ड्रेनेज सुविधा (ड्रेनेज सुविधा असल्याबाबत स्थानिक प्राधिकरणाचे नकाशासह प्रमाणपत्र)
७. वसतिगृह सुविधा (परिसरात २०% विद्यार्थ्यांची राहण्याची सोय असल्याचे प्रमाणपत्र)
१७. उच्च व तंत्र शिक्षण विभाग , शासन निर्णय क्रमांक: एनजीसी २०१७/(२२९/१७)/मशि -४, दिनांक- १२ ऑक्टोबर २०१७ सोबतच्या परिशिष्ट ब मधील अनुक्रमांक ११ येथे विहित केलेल्या कक्ष / रूम करीता फर्निचर खरेदी केल्याची अधिकृत पावती किंवा त्यासाठी किमान रु. १ लक्ष शिल्लक असल्याबाबतचा पुरावा.
१८. ग्रंथालयात पुस्तकांची सुविधा: मागणी केलेल्या विद्याशाखेशी संबंधित किमान १०० पुस्तके खरेदी केल्याची अधिकृत पावती.
१९. महाविद्यालय भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरु केले जाणार असेल तर प्रथम संलग्नीकरण मिळाल्यापासून ५ वर्षांमध्ये महाविद्यालय ज्या स्थळबिंदूसाठी मंजूर झाले आहे त्याठिकाणी स्वतःच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करणार असल्याबाबतचे संस्थेचे हमीपत्र. ( विहित नमुना Downlaod )
२०. विद्यापीठाकडे आवेदन शुल्काचा भरणा केल्याबाबतची पावती व तपशील
क्रमांक अर्ज भरण्याच्या सूचना
१. कृपया तारांकित (*) असलेला सर्व अनिवार्य तपशील भरा.
२. अपलोड करण्याची फाईल ही pdf फॉरमॅट मध्ये असावी आणि फाईल size ही 20 mb पेक्षा कमी असावी.
३. संस्थेने द्यावयाचे सर्व हमीपत्र,साक्षांकित प्रती/कागदपत्र हे संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्या स्वाक्षरीने देण्यात यावेत.
४. File Choose केल्यानंतर बटन दाबून अपलोड करावी.
५. अर्जाचा फॉर्म वेगवेगळ्या Section मध्ये विभागलेला आहे. (उदा. संस्थेचा आणि अर्जदाराचा तपशील, प्रस्तावाचा प्रकार व तपशील, संस्थेची इतर माहिती, संस्थेच्या महाविद्यालयाची माहिती, इत्यादी.)
६. एक Section भरल्यानंतर, कृपया बटणावर क्लिक करा.
७. एका संस्थेस एका पेक्षा अधिक अर्ज करावयाचे असतील तर प्रत्येक नवीन अर्ज करण्याकरीता "नवीन अर्ज" येथे जाणे आवश्यक आहे.
८. अर्ज करताना नवीन महाविद्यालय,नवीन अभ्यास पाठयक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकडीसाठी वेगळा अर्ज करावा.
९. जर एखादी व्यक्ती विशिष्ट Section (उदा. संस्था आणि अर्जदाराचे तपशील किंवा इतर) भरल्यानंतर लॉग आऊट झाली, तर त्या व्यक्तीने उर्वरित अर्ज भरण्यासाठी "दाखल प्रस्तावांची यादी" येथे जाणे आवश्यक आहे.
१०. आवेदन शुल्क भरल्यानंतरच तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाईल.