क्रमांक | अंतिम मान्यतेसाठी अर्ज भरताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत (उच्च व तंत्र शिक्षण विभाग , शासन निर्णय क्रमांक: एनजीसी २०१७/(२९/१७)/मशि -४, दिनांक- १५ सप्टेंबर २०१७ नुसार) |
---|---|
१. | नवीन महाविद्यालय सुरु करण्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या इरादापत्राचा शासन निर्णय. |
२. | इरादापत्रामध्ये विहित केलेल्या सर्व अटी व शर्तीची पूर्तता झाली असल्याचे संस्थेने दिलेले हमीपत्र. ( विहित नमुना Downlaod ) |
३. | चालू वर्षाच्या तपशीलवार अंदाजपत्रकाची प्रत. |
४. | संस्थेच्या मागील वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालाची प्रत. |
५. | इरादापत्र देण्यासाठी जे जमिनीचे निकष विहित केले आहेत ती जमीन (संस्थेची स्वतःची किंवा भाडेतत्त्वावरील ) अकृषक असल्यासंदर्भातील महसूल विभागाचे आदेश /गावठाण जमिनीसंदर्भात महसूल व वनविभागाच्या दिनांक १३/०४/२०२२ रोजीच्या परिपत्रकानुसार अकृषक सनद. ( माहितीसाठी परिपत्रकाची प्रत Downlaod) |
६. |
|
७. |
१. प्रस्तावित महाविद्यालयाची इमारत (संस्थेची /भाडेतत्त्वावरील )- संबंधित स्थानिक स्वराज संस्था किंवा अन्य संबंधित प्राधिकरणाचे इमारत बांधकाम पुर्णत्वाबाबतचे प्रमाणपत्र, ज्यामध्ये इमारतीचे क्षेत्रफळ चौ.फु./चौ.मी. गट/सर्वे नंबर आणि ज्याभागातील इमारत आहे त्याबाबतचा तपशील नमूद अनिवार्य आहे. २. इमारत भाडेतत्वावरील असल्यास अर्ज करावयाच्या वर्षापासून पुढील किमान ५ वर्ष कालावधीचा नोंदणीकृत भाडेकरारनामा ३. शैक्षणिक व प्रशासकीय इमारती मधील कक्षांचा तपशील ४. पाणी सुविधा (स्थानिक प्राधिकरणाची पाणी पट्टी पावती) ५. वीज सुविधा (महाविद्यालयाचा अंतिम मान्यतेचा प्रस्ताव ज्या महिन्यात दाखल केला जाईल त्या पूर्वीच्या महिन्यातील वीज देयकाची प्रत) ६. ड्रेनेज सुविधा (ड्रेनेज सुविधा असल्याबाबत स्थानिक प्राधिकरणाचे नकाशासह प्रमाणपत्र) ७. वसतिगृह सुविधा (परिसरात २०% विद्यार्थ्यांची राहण्याची सोय असल्याचे प्रमाणपत्र) |
८. | प्रस्तावित महाविद्यालयाच्या इमारतीत सेमिनार रूम, लेक्चर रूम, स्टाफ रूम, कॉमन रूम इत्यादी ठिकाणी आवश्यक फर्निचर उपलब्ध असल्याबाबतचे संस्थेचे हमीपत्र ( विहित नमुना Downlaod ) . |
९. | उच्च व तंत्र शिक्षण विभाग , शासन निर्णय क्रमांक: एनजीसी २०१७/(२९/१७)/मशि -४, दिनांक- १५ सप्टेंबर २०१७ सोबतच्या परिशिष्ट ड मधील कक्ष / रूम करीता फर्निचर खरेदी केल्याची अधिकृत पावती. |
१०. | ग्रंथालयात पुस्तकांची सुविधा: मागणी केलेल्या विद्याशाखेशी संबंधित किमान ५०० पुस्तके खरेदी केल्याची अधिकृत पावती. |
११. | महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत निर्धारित आवश्यक सामग्री करीता इरादापत्र मंजूर झाल्याच्या दिनांकापासून ते अंतिम मान्यतेकरीता अर्ज सादर केल्याच्या दिनांकापर्यंतचे बँक स्टेटमेंट (विज्ञान विद्येशाखेसाठी किमान रु.१ .०० लाख प्रत्येक विषयासाठी राखीव) व संस्थेचे हमीपत्र ( विहित नमुना Downlaod ) |
१२. | प्रस्तावित महाविद्यालयात विद्यार्थ्यांना खेळण्याची सोय , उपहारगृह ,आरोग्य सुविधा बाबतचे संस्थेचे हमीपत्र. ( विहित नमुना Downlaod ) |
१३. | संबंधित संस्था प्रस्तावित महाविद्यालयाकरिता क्रीडांगण भाड्याने वापरणार असल्यास रु.५०० च्या स्टँप पेपरवर नोंदणीकृत भाडेकराराची साक्षांकित प्रत. |
१४. | महाविद्यालय भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरु केले जाणार असेल तर प्रथम संलग्नीकरण मिळाल्यापासून ५ वर्षांमध्ये महाविद्यालय ज्या ठिकाणासाठी मंजूर झाले आहे त्याठिकाणी स्वतःच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करणार असल्याबाबतचे संस्थेचे हमीपत्र. ( विहित नमुना Downlaod ) |
१५. | शासनाचे कायम विना अनुदानित धोरण लक्षात घेता अर्जासोबत मंजूर करण्यात येणाऱ्या नवीन महाविद्यालयासाठी नियमानुसार वेतन व वेतनेतर खर्च संस्था करणार असल्याबाबतचे रु.५०० च्या स्टँप पेपरवर नोंदणीकृत प्रतिज्ञापत्र ( विहित नमुना Downlaod ) |
१६. |
नवीन महाविद्यालय सुरु करण्यासाठी अर्जदार संस्थेच्या सद्यस्थितीत अस्तित्वात असणाऱ्या महाविद्यालयामध्ये विद्यापीठ अनुदान आयोग तसेच, शासनाने विहित केलेल्या निकषानुसार अ ) मूलभूत व भौतिक सुविधा उपलब्ध आहेत ब ) अर्हताधारक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपलब्ध आहेत याबाबत संस्थेचे संबंधित अकृषी विद्यापीठाने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र |
१७. | प्रस्तावित महाविद्यालयाला मान्यता मिळाल्यास अर्हताधारक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नेमण्यात येतील याबाबत संस्थेचे हमीपत्र. ( विहित नमुना Downlaod ) |
१८. | नवीन महाविद्यालय सुरु करण्यासाठी अर्जदार संस्थेच्या सद्य:स्थितीत अस्तित्वात असणारी महाविद्यालये इरादापत्राच्या कालावधीत मूल्यांकन / पुनर्मूल्यांकनाकरिता पात्र ठरली असल्यास नॅक / एनबीए मानांकन व मूल्यांकन , पुनर्मूल्यांकन करून घेण्यासंदर्भातील तपशील |
क्रमांक | अर्ज भरण्याच्या सूचना |
---|---|
१. | कृपया तारांकित (*) असलेले सर्व अनिवार्य तपशील भरा. |
२. | अपलोड करण्याची फाईल ही pdf फॉरमॅट मध्ये असावी आणि फाईल size ही 20 mb पेक्षा कमी असावी. |
३. | File Choose केल्यानंतर बटन दाबून अपलोड करावी. |
४. | अर्जाचा फॉर्म वेगवेगळ्या Section मध्ये विभागलेला आहे. (उदा. संस्थेची कागदपत्रे, जागेसंदर्भातील कागदपत्रे, शैक्षणिक व प्रशासकीय इमारत तपशील, इत्यादी.) |
५. | एक Section भरल्यानंतर, कृपया बटणावर क्लिक करा. |
६. | अर्ज करण्यासाठी अंतिम मान्यता अर्ज येथे क्लिक करावे. |
७. | एका संस्थेस एकापेक्षा अधिक अर्ज करावयाचे असतील तर पहिला अर्ज भरल्यानंतर पुढील अर्ज भरण्याकरिता पुन्हा अंतिम मान्यता अर्ज येथे जाणे आवश्यक आहे. |
८. | संस्थेने द्यावयाचे सर्व हमीपत्र हे संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्या स्वाक्षरीने देण्यात यावेत. |
९. | जर एखादा अर्जदार विशिष्ट Section (उदा.संस्थेची कागदपत्रे, जागेसंदर्भातील कागदपत्रे, शैक्षणिक व प्रशासकीय इमारत तपशील) भरल्यानंतर लॉग आऊट झाला, तर त्या अर्जदाराने उर्वरित अर्ज भरण्यासाठी दाखल प्रस्तावांची यादी येथे जाणे आवश्यक आहे. |