ऑनलाईन माहिती अधिकार प्रणाली

या पोर्टलद्वारे केंद्र सरकार किंवा अन्य राज्य शासनांचे विभाग/सार्वजनिक प्राधिकरण यांच्याकरिता माहितीचा अधिकार अर्ज/प्रथम अपील दाखल करू नका. दाखल केल्यास, परताव्याच्या रकमेशिवाय अर्ज परत पाठविला जाईल.

या पोर्टलवरून पेमेंट गेटवेच्या सुविधेसह, ऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज/प्रथम अपील सादर करता येईल. इंटरनेट बँकींग/डेबीट कार्ड/क्रेडिट कार्ड याद्वारे शुल्क भरणा करता येईल. या पोर्टलद्वारे केवळ भारतीय नागरिकांना महाराष्ट्र शासनाचे विभाग/सार्वजनिक प्राधिकरण यांच्याकडे माहितीचा अधिकार अर्ज/प्रथम अपील करता येईल. सद्यस्थितीत, ऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज/प्रथम अपील केवळ मंत्रालयीन विभागांसाठीच उपलब्ध आहे, क्षेत्रीय कार्यालयांसाठी नाही.

कृपया माहितीचा अधिकार अर्ज/प्रथम अपील दाखल करताना सूचना काळजीपूर्वक वाचा.


मदत कक्ष: या पोर्टलविषयी कोणत्याही विचारणेसाठी कृपया कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत (सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.३०, सोमवार ते शनिवार, सार्वजनिक सुट्ट्या वगळता) 8800171742 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अथवा rti.support@maharashtra.gov.in येथे ई-मेल पाठवा.

ही संकेतस्थळाची बीटा आवृत्ती आहे. या संकेतस्थळाच्या संकल्पनेशी संबंधीत आपल्या सूचना/अभिप्राय कृपया rti.support@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठवा.

मुख्य पृष्ठ | भारताचे राष्ट्रीय पोर्टल| माहिती आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडे तक्रार आणि द्वितीय अपील| नेहमीचे प्रश्न

Best viewed in Google Chrome and Mozilla Firefox web browsers