क्रमांक | अंतिम मान्यतेसाठी (कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक) अर्ज भरताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत (उच्च व तंत्र शिक्षण विभाग , शासन निर्णय क्रमांक: एनजीसी २०१७/(२२९/१७)/मशि -४, दिनांक- १२ ऑक्टोबर २०१७ नुसार) |
---|---|
१. | नवीन महाविद्यालयाकरिता अर्ज करण्यासाठी संस्थेने अर्जदारास प्राधिकृत केल्याबाबतचे कागदपत्र. ( विहित नमुना Downlaod ) |
२. | संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र.(मुंबई सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियम १९५०, संस्था नोंदणी अधिनियम १८६०, कंपनी अधिनियम, १९५६, कंपनी अधिनियम २०१३) |
३. | संस्थेच्या संविधानात शैक्षणिक बाबीसंबंधी नमूद तरतुदीबाबतची कागदपत्रे. |
४. | नवीन महाविद्यालय सुरु करण्यासंबंधी संस्थेच्या ठरावाची प्रत. |
५. | संस्थेच्या अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयांच्या मूल्यांकनाची सद्यस्थिती/प्रमाणपत्र. |
६. | संस्थेची चालू वर्षाच्या तपशीलवार अंदाजपत्रकाची साक्षांकित प्रत. |
७. | संस्थेच्या मागील पाच वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालाच्या प्रती. |
८. | संस्थेचे आर्थिक व्यवहार राष्ट्रीयकृत / शेड्युल बँकेमार्फत केले जात असल्याचे कागदपत्र. (संस्थेचे नाव ,बँकेचे नाव व बँकेचा IFSC CODE दर्शवणारे कागदपत्र उदा. बँक बॅलन्स स्टेटमेंट, पासबुक चे प्रथम पृष्ठ व अंतिम पृष्ठ) |
९. |
प्रस्ताव ज्या शैक्षणिक वर्षासाठी दाखल केला आहे त्या शैक्षणिक वर्षापासून पुढीलप्रमाणे किमान 5 वर्ष, किमान मुदत ठेवची (Fix Deposit) प्रमाणित प्रत व संयुक्त आश्वासन पत्र (विहित नमुना Download) अ) विधी महाविद्यालय : रु. 15 लाख ब) पारंपरिक महाविद्यालय रु . 7 लाख (उदा. कला ,विज्ञान, वाणिज्य इ.) |
१०. | शासनाचे कायम विना अनुदानित धोरण लक्षात घेता, मंजुर करण्यात येणाऱ्या नवीन महाविद्यालयासाठी देण्यात येणारे इरादापत्र हे कायम विनाअनुदानित तत्त्वावरील महाविद्यालसाठी मान्य असल्याबाबतचे रु. ५०० /- च्या स्टॅम्प पेपरवर नोंदणीकृत हमीपत्र. (विहित नमुना Download) |
११. | संस्थेच्या अस्तित्वात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालय किंवा शाळा यांच्या इमारतीचा वापर वरिष्ठ महाविद्यालयासाठी केला जाणार नाही, असे हमीपत्र. ( विहित नमुना Download ) |
१२. | संस्थेच्या एकाच कॅम्पसच्या भागात नवीन प्रस्तावित महाविद्यालय/शाळा असेल तर त्या कॅम्पस मधील कनिष्ठ महाविद्यालय/शाळा/अन्य प्रकारचे महाविद्यालय यांच्या जागेसाठी ठेवलेले राखीव क्षेत्रफ़ळ व त्या संबंधीचे जमिनीचे कागदपत्र. उदा.(७/१२)/ मालमत्ता पत्रक. |
१३. |
|
१४. |
१. प्रस्तावित महाविद्यालयाची इमारत (संस्थेची /भाडेतत्त्वावरील )- संबंधित स्थानिक स्वराज संस्था किंवा अन्य संबंधित प्राधिकरणाचे इमारत बांधकाम पुर्णत्वाबाबतचे प्रमाणपत्र, ज्यामध्ये इमारतीचे क्षेत्रफळ चौ.फु./चौ.मी. गट/सर्वे नंबर आणि ज्याभागातील इमारत आहे त्याबाबतचा तपशील नमूद अनिवार्य आहे. २. इमारत भाडेतत्वावरील असल्यास अर्ज करावयाच्या वर्षापासून पुढील किमान ५ वर्ष कालावधीचा नोंदणीकृत भाडेकरारनामा ३. शैक्षणिक व प्रशासकीय इमारती मधील कक्षांचा तपशील ४. पाणी सुविधा (स्थानिक प्राधिकरणाची पाणी पट्टी पावती) ५. वीज सुविधा (महाविद्यालयाचा अंतिम मान्यतेचा प्रस्ताव ज्या महिन्यात दाखल केला जाईल त्या पूर्वीच्या महिन्यातील वीज देयकाची प्रत) ६. ड्रेनेज सुविधा (ड्रेनेज सुविधा असल्याबाबत स्थानिक प्राधिकरणाचे नकाशासह प्रमाणपत्र) ७. वसतिगृह सुविधा (परिसरात २०% विद्यार्थ्यांची राहण्याची सोय असल्याचे प्रमाणपत्र) |
१५. | उच्च व तंत्र शिक्षण विभाग , शासन निर्णय क्रमांक: एनजीसी २०१७/(२२९/१७)/मशि -४, दिनांक- १२ ऑक्टोबर २०१७ सोबतच्या परिशिष्ट ड मधील कक्ष / रूम करीता फर्निचर खरेदी केल्याची अधिकृत पावती. |
१६. | ग्रंथालयात पुस्तकांची सुविधा: मागणी केलेल्या विद्याशाखेशी संबंधित किमान १०० पुस्तके खरेदी केल्याची अधिकृत पावती. |
१७ | महाविद्यालय भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरु केले जाणार असेल तर प्रथम संलग्नीकरण मिळाल्यापासून ५ वर्षांमध्ये महाविद्यालय ज्या ठिकाणासाठी मंजूर झाले आहे त्याठिकाणी स्वतःच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करणार असल्याबाबतचे संस्थेचे हमीपत्र. ( विहित नमुना Downlaod ) |
१८. | नवीन महाविद्यालय सुरु करण्यासाठी अर्जदार संस्थेच्या सद्य:स्थितीत अस्तित्वात असणारी महाविद्यालये इरादापत्राच्या कालावधीत मूल्यांकन / पुनर्मूल्यांकनाकरिता पात्र ठरली असल्यास नॅक / एनबीए मानांकन व मूल्यांकन , पुनर्मूल्यांकन करून घेण्यासंदर्भातील तपशील |
क्रमांक | अर्ज भरण्याच्या सूचना |
---|---|
१. | कृपया तारांकित (*) असलेला सर्व अनिवार्य तपशील भरा. |
२. | अपलोड करण्याची फाईल ही pdf फॉरमॅट मध्ये असावी आणि फाईल size ही 20 mb पेक्षा कमी असावी. |
३. | संस्थेने द्यावयाचे सर्व हमीपत्र,साक्षांकित प्रती/कागदपत्र हे संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्या स्वाक्षरीने देण्यात यावेत. |
४. | File Choose केल्यानंतर बटन दाबून अपलोड करावी. |
५. | अर्जाचा फॉर्म वेगवेगळ्या Section मध्ये विभागलेला आहे. (उदा. संस्थेचा आणि अर्जदाराचा तपशील, प्रस्तावित महाविद्यालयाचा तपशील, संस्थेची इतर माहिती, संस्थेच्या महाविद्यालयाची माहिती, इत्यादी.) |
६. | एक Section भरल्यानंतर, कृपया बटणावर क्लिक करा. |
७. | एका संस्थेस एका पेक्षा अधिक अर्ज करावयाचे असतील तर प्रत्येक नवीन अर्ज करण्याकरीता "नवीन महाविद्यालय अर्ज" येथे जाणे आवश्यक आहे. |
८. | अर्ज करताना पारंपरिक/ विधी महाविद्यालयासाठी वेगळा अर्ज करावा. |
९. | जर एखादी व्यक्ती विशिष्ट Section (उदा. संस्था आणि अर्जदाराचे तपशील किंवा इतर) भरल्यानंतर लॉग आऊट झाली, तर त्या व्यक्तीने उर्वरित अर्ज भरण्यासाठी "दाखल प्रस्तावांची यादी" येथे जाणे आवश्यक आहे. |
१०. | विद्याशाखा फी भरल्यानंतरच तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाईल. |