क्रमांक | नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकडी करिता अर्ज भरताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत (उच्च व तंत्र शिक्षण विभाग , शासन निर्णय क्रमांक: मान्यता-2025/ई-1319878/मशि-4, दिनांक 18 सप्टेंबर, 2025 नुसार) |
---|---|
१. | नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकडी करिता अर्ज करण्यासाठी संस्थेने अर्ज करण्यासाठी प्राधिकृत केल्याबाबतचे प्रमाणपत्र. ( विहित नमुना Download ) |
२. | संस्था नोंदणी प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत.(मुंबई सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियम १९५०, संस्था नोंदणी अधिनियम १८६०, कंपनी अधिनियम, १९५६, कंपनी अधिनियम २०१३) |
३. | नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकडी ज्या महाविद्यालयात सुरु करवावयाचे आहे, त्या महाविद्यालयाचा अंतिम मान्यता बाबतचा शासन निर्णय. |
४. | संस्थेच्या चालू वर्षाच्या तपशीलवार अंदाजपत्रकाची साक्षांकित प्रत. |
५. | संस्थेच्या मागील वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालाची सनदी लेखापाल (Charted Accountant) यांनी प्रमाणित केलेली प्रत. |
६. | संस्थेचे आर्थिक व्यवहार राष्ट्रीयकृत / शेड्युल बँकेमार्फत केले जात असल्याचे कागदपत्र. (संस्थेचे नाव ,बँकेचे नाव व बँकेचा IFSC CODE दर्शवणारे कागदपत्र उदा. बँक बॅलन्स स्टेटमेंट, पासबुक चे प्रथम पृष्ठ व अंतिम पृष्ठ) |
७. |
प्रस्ताव ज्या शैक्षणिक वर्षासाठी दाखल केला आहे त्या शैक्षणिक वर्षापासून पुढीलप्रमाणे किमान ५ वर्ष, किमान मुदत ठेवची (Fix Deposit) प्रमाणित प्रत व संयुक्त आश्वासन पत्र (विहित नमुना Download) (१) नवीन पाठयक्रम - रु.५ लाख (२) विषय - रु.२ लाख (३) विद्याशाखा - रु.५ लाख (४) अतिरिक्त तुकडी - रु.३ लाख |
८. | शासनाचे कायम विनाअनुदानित धोरण लक्षात घेता, अर्जासोबत महाविद्यालयाचा नियमानुसार वेतन व वेतनतर खर्च संस्था करणार असल्याबाबतचे रु. ५00/- स्टॅम्पपेपरवर नोंदणीकृत हमीपत्र. ( विहित नमुना Download ) |
९. | संस्थेचे सद्यस्थितीत कनिष्ठ महाविद्यालय/शाळा अस्तित्वात असेल तर, कनिष्ठ महाविद्यालय/शाळेच्या अस्तित्वात असलेल्या इमारतीचा वापर प्रस्तावित वरिष्ठ महाविद्यालयासाठी केला जाणार नाही, असे हमीपत्र तसेच, कनिष्ठ महाविद्यालयाच्या बांधकामाचा प्रमाणित नकाशा ( विहित नमुना Download ) |
१०. |
|
११. |
१. नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकडी ज्या महाविद्यालयात सुरु करवावयाचे आहे, त्या महाविद्यालयाची इमारत (संस्थेची /भाडेतत्त्वावरील )- संबंधित स्थानिक स्वराज संस्था किंवा अन्य संबंधित प्राधिकरणाचे इमारत बांधकाम पुर्णत्वाबाबतचे प्रमाणपत्र, ज्यामध्ये इमारतीचे क्षेत्रफळ चौ.फु./चौ.मी. गट/सर्वे नंबर आणि ज्याभागातील इमारत आहे त्याबाबतचा तपशील नमूद अनिवार्य आहे. २. इमारत भाडेतत्वावरील असल्यास अर्ज करावयाच्या वर्षापासून पुढील किमान ५ वर्ष कालावधीचा नोंदणीकृत भाडेकरारनामा ३. शैक्षणिक व प्रशासकीय इमारती मधील कक्षांचा तपशील ४. पाणी सुविधा (प्रस्ताव ज्या वर्षी दाखल केला जाईल त्या पूर्वीच्या वर्षातील स्थानिक प्राधिकरणाची पाणी पट्टी पावती) ५. वीज सुविधा (प्रस्ताव ज्या महिन्यात दाखल केला जाईल त्या पूर्वीच्या महिन्यातील वीज देयकाची प्रत) ६. ड्रेनेज सुविधा (ड्रेनेज सुविधा असल्याबाबत स्थानिक प्राधिकरणाचे नकाशासह प्रमाणपत्र) ७. वसतिगृह सुविधा (परिसरात २०% विद्यार्थ्यांची राहण्याची सोय असल्याचे प्रमाणपत्र) |
१२. | उच्च व तंत्र शिक्षण विभाग , शासन निर्णय क्रमांक: मान्यता-2025/ई-1319878/मशि-4, दिनांक 18 सप्टेंबर, 2025 सोबतच्या परिशिष्ट अ मधील अनुक्रमांक १३ येथे विहित केलेल्या मधील कक्ष / रूम करीता फर्निचरसाठी किमान रु.५.00 लक्ष शिल्लक असल्याबाबतचा पुरावा. |
१३. | ग्रंथालयात पुस्तकांची सुविधा: मागणी केलेल्या विद्याशाखेशी संबंधित किमान १०० पुस्तके खरेदी केल्याची अधिकृत पावती. |
१४. | महाविद्यालय भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरु केले जाणार असेल तर प्रथम संलग्नीकरण मिळाल्यापासून ५ वर्षांमध्ये महाविद्यालय ज्या स्थळबिंदूसाठी मंजूर झाले आहे त्याठिकाणी स्वतःच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करणार असल्याबाबतचे संस्थेचे हमीपत्र. ( विहित नमुना Download ) |
१५. | महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमातील कलम 109(6) मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे ज्या संस्थेची यापुर्वीचे महाविद्यालय अस्तित्वात आहे अशा संस्थेने नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकडीची मागणी केल्यास पुर्वीच्या महाविद्यालयाचा नॅक/एनबीए मुल्यांकन अथवा पुनर्मुल्यांकनाबाबतचा तपशील |
१६. | विद्यापीठाकडे आवेदन शुल्काचा भरणा केल्याबाबतची पावती व तपशील |
क्रमांक | अर्ज भरण्याच्या सूचना |
---|---|
१. | कृपया तारांकित (*) असलेला सर्व अनिवार्य तपशील भरा. |
२. | अपलोड करण्याची फाईल ही pdf फॉरमॅट मध्ये असावी आणि फाईल size ही 20 mb पेक्षा कमी असावी. |
३. | संस्थेने द्यावयाचे सर्व हमीपत्र,साक्षांकित प्रती/कागदपत्र हे संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्या स्वाक्षरीने देण्यात यावेत. |
४. | File Choose केल्यानंतर बटन दाबून अपलोड करावी. |
५. | अर्जाचा फॉर्म वेगवेगळ्या Section मध्ये विभागलेला आहे. (उदा. अर्जदार संस्थेचा तपशील, प्रस्तावाचा प्रकार व तपशील, संस्थेची इतर माहिती, संस्थेच्या महाविद्यालयाची माहिती, इत्यादी.) |
६. | एक Section भरल्यानंतर, कृपया बटणावर क्लिक करा. |
७. | एका संस्थेस एका पेक्षा अधिक अर्ज करावयाचे असतील तर प्रत्येक नवीन अर्ज करण्याकरीता "नवीन अर्ज" येथे जाणे आवश्यक आहे. |
८. | अर्ज करताना नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकडी करिता वेगळा अर्ज करावा. |
९. | जर एखादी व्यक्ती विशिष्ट Section (उदा. संस्था आणि अर्जदाराचे तपशील किंवा इतर) भरल्यानंतर लॉग आऊट झाली, तर त्या व्यक्तीने उर्वरित अर्ज भरण्यासाठी "दाखल प्रस्तावांची यादी" येथे जाणे आवश्यक आहे. |
१०. | आवेदन शुल्क भरल्यानंतरच तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाईल. |