Designed and built with care, filled with creative elements

Pursuing excellence in higher education

Top
  /  Economy   /  कराडच्या प्रगती शर्माचा डंका, ‘कॅम्पस’मध्ये 25 लाखांच्या नोकरीचे पॅकेज……………

कराडच्या प्रगती शर्माचा डंका, ‘कॅम्पस’मध्ये 25 लाखांच्या नोकरीचे पॅकेज……………

कराडच्या प्रगती शर्माचा डंका, ‘कॅम्पस’मध्ये 25 लाखांच्या नोकरीचे पॅकेज……………

कराडः कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (Government Engineering College) नामांकीत कंपन्यांनी घेतलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये 25 लाखांच्या नोकरीचे पॅकेज आयटीच्या प्रगती शर्मा या विद्यार्थिनीने पटकावले. 1959 साली स्थापन झालेल्या कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात यंदा हीरक महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. त्यावेळी नामांकीत कंपन्यांनी कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले. या कॉलेजच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये तब्बल 185 विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली. त्यात सर्वोच्च 25 लाखांच्या नोकरीचे पॅकेज आयटीच्या प्रगती शर्मा या विद्यार्थिनीने पटकावले. (Karad Pragati Sharma Gets Rs 25 Lakh Job Package)

मी कराडच्या कॉलेजला रडून रडून आले होते, मला मेडिकलला जायचं होतं, परंतु इंजिनीअरिंगला ऍडमिशन मिळाल्यानंतर मला भीती वाटत होती. मात्र येथील शिक्षकांच्या शिकवणीमुळे माझा इंजिनीअरिंगमधील इंटरेस्ट वाढला. आता मिळालेल्या यशाने मला आनंद झाला, अशी प्रतिक्रिया 25 लाखांच्या नोकरीचे पॅकेज मिळालेल्या प्रगती शर्मा टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

मुलीने मिळवलेल्या यशाचा अभिमान; वडिलांची भावना
मुलीने मिळवलेल्या यशाचा अभिमान असून, तिच्या यशात तिची आई, भाऊ तसेच कराड इंजिनीअरिंग कॉलेजच्या शिक्षकांचे मोठे योगदान आहे. आम्ही कॉलेजमध्ये तिचं ऍडमिशन घेतल्यानंतर सोडून येताना फार दुःख झालं होतं, मात्र कराड इंजिनीअरिंग कॉलेजच्या शिक्षकांनी आता ही आमची मुलगी आहे, तिची काळजी करू नका, असा विश्वास दिला होता, अशी माहिती प्रगती शर्माच्या वडिलांनी दिली.

सर्वोच्च 25 लाखांच्या पॅकेजचा मान महाविद्यालयाच्या प्रगती शर्माने पटकावला
कोरोना काळात नोकऱ्यांची स्थिती बिकट असतानाच कराडच्या शासकीय (Government Engineering College) अभियांत्रिकी महाविद्यालय त्याला अपवाद आहे. महाविद्यालयात प्लेसमेंटच्या डिसेंबरअखेर 185 वर ऑफर्स पोहोचल्या आहेत. त्यात टीसीएस, कॅपजेमनी, कॉग्निझंट नामांकीत कंपन्यांचा समावेश आहे. त्यामध्ये सर्वोच्च 25 लाखांच्या पॅकेजचा मान महाविद्यालयाच्या प्रगती शर्माने पटकावला.

Post a Comment

Font Resize