Designed and built with care, filled with creative elements

Pursuing excellence in higher education

Top

आमच्या विषयी

  /  आमच्या विषयी

प्रस्तावना

शालेय शिक्षण विभागातून स्वतंत्र होऊन सन १९९2 मध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाची स्थापना झाली. राज्याच्या शैक्षणिक व सामाजिक उद्दिष्टांची पूर्तता करून गुणवत्तापूर्ण उच्च व तंत्रशिक्षणाची वाढ व विकास करणारा हा विभाग म्हणजे एक जबाबदार असा सर्वोच्च अधिकारी आहे जो या सर्व कार्यक्रमांची धुरा सांभाळतो व त्यांना साहाय्य ही करतो.

मागील काही वर्षांमध्ये राज्याने उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात खूप मोठी झेप घेतलेली आहे. महाराष्ट्रातील उच्च व तंत्रशिक्षण व्यवस्था एका मोठ्या व्यवस्थेत परिवर्तीत झाली आहे, जी राज्यभरातील संस्थांना शिक्षण व अनुभवाची संधी व्यापक प्रमाणात उपलब्ध करून देते. विविध व्यवसाय व शाखांमधील प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी व संशोधनात्मक पातळींवर देखील ही व्यवस्था कार्यरत आहे. याचीच फलनिष्पत्ती आहे की, महाराष्ट्र आज देशातील काही आघाडींवर असलेल्या राज्यांमध्ये समाविष्ट आहे. जे महाविद्यालयांची संख्या, विद्यार्थी संख्या, विद्यार्थी प्रवेश या सर्वच अटींवर उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात अग्रेसर आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभाग हा शिक्षणाप्रती कमालीची बांधिलकी मानणारा असून गुणवत्तापुर्वक शिक्षणाचे महत्त्व जाणणारा आहे आणि म्हणूनच अनेक बाबतीत पुढाकार घेऊन सर्वोच्च गुणवत्ता प्रमाण मिळवण्यासाठी शिक्षणाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. गुणवत्ता मुल्यांकन व पुनर्मूल्यांकन हे उच्च शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांना व संस्थांना म्हणूनच सक्तीचे केले आहे कारण यातूनच संस्थांचे गुणवत्ता संवर्धन होणार आहे.

या विभागाने आजवर अनेक उद्दिष्टे प्राप्त केलेली आहेत आणि भविष्यातही याहून अधिक मेहनत घेण्यासाठी हा विभाग सज्ज आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या विकासाची उद्दिष्टे व ध्येये ही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कार्यसुसंगत ठेवली आहेत. कालानुरूप, सर्वांना सहजप्राप्य, निरंतर चालणारे उच्च मुल्ये असणाऱ्या उच्च शिक्षणास प्रोत्साहित करणे, हे ही त्यातच अंतर्भूत आहे.

Font Resize